पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले   

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी दोन रुपयांनी वाढ केली आहे. इंधनावरील उत्पादन शुल्कवाढ सोमवारी मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.
पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लीटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये करण्यात आले असल्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र, किरकोळ किमतींवर काय परिणाम होईल, हे आदेशात सांगण्यात आलेले नाही.आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोल ९४ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८७ रुपये प्रति लीटर आहे. 

Related Articles